Search This Blog

Sunday, 17 April 2016

Praju ....

प्राजू ....


चित्रपट  : टाईमपास २ (२०१५)
गीतकार : मंगेश कांगणे
संगीत   : चिनार-महेश
गायक   : महालक्ष्मी अय्यर, रिषीकेश कामेरकर


-----------------------------------------------------


किलबिलते गाणे नवे, भिरभिरते गुलाबी थवे
हाय मी बावरू...  की सावरू
माझे मला न कळे
सळसळत्या पानामधे, वाऱ्याच्या कानामधे
कोणी बोलले .... मी ऎकले
वाटे मनाला हवे
प्राजू...
प्राजू...
प्राजू ...ही प्राजू....

हा छंद आहे बरा, मौजेच्या नाना तऱ्हा
स्वप्नापरी आभास का सारखा
वेळी फुलविते फुले.. माडांना फुटले तुरे
स्वप्नी जसे करतात खाणाखुणा
फेर धरिती किरणे हळू , गुणगुणती गाणे जणू
हाय मी बावरू की सावरू, माझे मला ना कळे
प्राजू ...
प्राजू ...
प्राजू ... ही प्राजू

थरथरत्या पाण्यातला, लहरीच्या गाण्यातला
उमजेल का..  सूर हा नवा कोणता
भिजण्याचा करती गुन्हा, रुजवाती येती पुन्हा
नादावला जीव हा इथे का जरा
दरवळल्या दाही दिशा , श्वासात भिनली नशा

हाय मी बावरू की सावरू, माझे मला ना कळे
प्राजू... (हम्म हम्म हम्म )
प्राजू... (ओहो हो हो)
प्राजू... मी प्राजू..

-----------------------------------------------------
Video : 


#Timepaas2 #RaviJadhav #PriyaBapat #Praju

No comments:

Post a Comment