Search This Blog

Sunday, 17 April 2016

Man Udhan Varyache ....

मन उधान वा-याचे ....



चित्रपट   : अगं बाई..अरेच्या (२००४)

गायक    : शंकर महादेवन 

गीतकार : गुरु ठाकुर 

संगीत    : अजय-अतुल


 

 -----------------------------------------------------------------------

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते.....
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते (२)


आकाशी स्वप्‍नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिर्‍या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते...

मन उधाण वार्‍याचे,
गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते

--------------------------------------------------------------
Video :






#AjayAtul #ShankarMahadevan #SanjayNarvekar #ManUdhanVaryache 


No comments:

Post a Comment