Search This Blog

Sunday, 17 April 2016

Aabhas Ha ....

आभास हा ....


चित्रपट : यंदा कर्तव्य आहे (२००६)

गीतकार : आश्विनी शेंडे

संगित  : नीलेश मोहरीर 

गायक : राहुल वैद्य , वैशाली सामंत 



-------------------------------------------------------------


कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी, आवरू गं मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा... आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा... आभास हा 


कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कशी सावरू मी, आवरू रे मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला 
आभास हा... आभास हा



क्षणात सारे उधाण वारे, झुळूक होऊन जाती
कधी दूर तूही, कधी जवळ वाटे,
पण काहीच नाही हाती

मी अशीच हासते, उगीच लाजते,
पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते,तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा

दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा... आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा... आभास हा 



मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस खरा कसा रे

तू इथेच बस ना, हळूच हस ना, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे, नवी वाटे ही हवा

दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा... आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा... आभास हा 


कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा

कशी सावरू मी, आवरू रे मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा... आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा... आभास हा 

-------------------------------------------------------------

Video :
 
 
#AnkushChaudhari #AbhasHaa #SonuNigam #YandaKartavyaAahe

No comments:

Post a Comment