Search This Blog

Sunday, 17 April 2016

Praju ....

प्राजू ....

चित्रपट  : टाईमपास २ (२०१५)
गीतकार : मंगेश कांगणे
संगीत   : चिनार-महेश
गायक   : महालक्ष्मी अय्यर, रिषीकेश कामेरकर

-----------------------------------------------------

किलबिलते गाणे नवे, भिरभिरते गुलाबी थवे
हाय मी बावरू...  की सावरू
माझे मला न कळे
सळसळत्या पानामधे, वाऱ्याच्या कानामधे
कोणी बोलले .... मी ऎकले
वाटे मनाला हवे
प्राजू...
प्राजू...
प्राजू ...ही प्राजू....

हा छंद आहे बरा, मौजेच्या नाना तऱ्हा
स्वप्नापरी आभास का सारखा
वेळी फुलविते फुले.. माडांना फुटले तुरे
स्वप्नी जसे करतात खाणाखुणा
फेर धरिती किरणे हळू , गुणगुणती गाणे जणू
हाय मी बावरू की सावरू, माझे मला ना कळे
प्राजू ...
प्राजू ...
प्राजू ... ही प्राजू

थरथरत्या पाण्यातला, लहरीच्या गाण्यातला
उमजेल का..  सूर हा नवा कोणता
भिजण्याचा करती गुन्हा, रुजवाती येती पुन्हा
नादावला जीव हा इथे का जरा
दरवळल्या दाही दिशा , श्वासात भिनली नशा

हाय मी बावरू की सावरू, माझे मला ना कळे
प्राजू... (हम्म हम्म हम्म )
प्राजू... (ओहो हो हो)
प्राजू... मी प्राजू..

-----------------------------------------------------
Video : 

#Timepaas2 #RaviJadhav #PriyaBapat #Praju

Rang He Nawe Nawe ....

 रंग हे नवे नवे....

चित्रपट  : कॉफी आणि बरेच काही... (२०१५)
गीतकार : योगेश दामले
संगीत   : आदित्य बेडेकर
गायक   : साशा तिरुपती

-----------------------------------------------------

रंग हे नवे नवे
दुनिया है नई नई
Morning saw just Magica..
शामे भी है सुरमयी
दिल मे जैसे तीतलीयो के सैकडो है पर लगे
हसते हसते ख्वाब से जसे कोई जगे
गाठ जाई बांधली तरी कुठे दिसे ना तू
This is not a real crush,I guess its something more
ख्वाबोमे भी ... खयालो मे भी
एकटी असेन मी, असेच तो ही सोबती
रंग हे नवे नवे
दुनिया है नई नई
Morning saw just Magica..
शामे भी है सुरमयी

पहिले कधी ही ना,
मी अशी वेडी भोली-भाली फॅन्टसी जगलेच नव्हते कधी
अब तो जब दिन ढलता है,
ना पता कैसे कब सिंड्रेला बनून जाते मी माझी
आते जाते देखते वो दिल चुराके ले गया
चोर इतका आपला न वाटला कधी
सौ तऱह के रंग मेरे, सौ तरह के मूड है
आज सारखी अधीर, न तरी कधी
ख्वाबोमे भी ... खयालो मे भी
एकटी असेन मी, असेच तो ही सोबती

रंग हे नवे नवे
दुनिया है नई नई
Morning saw just Magica..
शामे भी है सुरमयी
दिल मे जैसे तीतलीयो के सैकडो है पर लगे
हसते हसते ख्वाब से जसे कोई जगे
गाठ जाई बांधली तरी कुठे दिसे ना तू
This is not a real crush,I guess its something more
ख्वाबोमे भी ... खयालो मे भी
एकटी असेन मी, असेच तो ही सोबती

-----------------------------------------------------

Videos :

#CoffeeAniBarachKahi #PrarthanaBehare

Aawaj Wadhav DJ ....

आवाज वाढव डीजे ....

चित्रपट    : पोश्टर गर्ल (२०१६)
गीतकार : क्षितीज पटवर्धन
संगीत   : अमितराज
गायक   : आनंद शिंदे, आदर्श शिंदे

-----------------------------------------------------

डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डाव
डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डाव

हे.. आलीया गावात अजब वरात
डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डाव
हे.. उगवली चांदणी जणू ही उन्हात
डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डाव

हे आलीया गावात अजब वरात
उगवली चांदणी जणू ही उन्हात
पोराला न्यायाला पोरगी दारात
व-हाड जोमात गाव कोमात

हे.... आवाज वाढव डीजे तुझ्या आईची ............
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
हाये ना..

डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डाव
डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डडाव डाव डाव डाव

हे घोड येतेय पाण्यापाशी, पाणी इथंच आलं
एक-एक पोरगी बघून निसता पाणी-पाणी झालं

हे घोड येतेय पाण्यापाशी, पाणी इथंच आलं
आणि एक-एक पोरगी बघून निसता पाणी-पाणी झालं
वडाची झाली हिरवळ, पिरतीचा फुलला मळा आ

आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ हाये

आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
हाये.. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
हाय ...आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये

अरे वाढीव वाढीव ..

हां..
अरे वाढीव वाढीव ...(ये पिपाण्या )

अरे शॉट झाला डोक्याला,हा आम्ही झालो झिरो
पोरांच्या ह्या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो

अरे शॉट झाला डोक्याला,हा आम्ही झालो झिरो
अरे पोरांच्या ह्या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो
वेळ झालीय स्ट्रॉन्ग, झाड कापताय ह्याचा चळा

अरे आवाज वाढव
अरे वाढव ना..
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
हाये आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये

रमत गमत येता आज नवरदेव
चढत चढत जाई नवऱ्या मुलीस चेव
सरत सरत येई वेळ मुहुर्ताची,
भरत भरत आली घटिका ही विवाहाची
अजब गजब घटना परत परत नाही,
रडत रडत नवरा सासुरास जाई

-----------------------------------------------------

Video :

#PoshterGirl #AawazWadhavDJ #SonaleeKulkarni

Tu Hee Re Majha Mitwa ....

तू ही रे माझा मितवा ....

चित्रपट  : मितवा (२०१५)
गीतकार : मंदार चोळकर
संगीत   : शंकर-एहसान-लॉय
गायक   : शंकर महादेवन, जानव्ही प्रभू

-----------------------------------------------------

वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा
माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे..

वेड्या मना सांग ना व्हावे खुळे का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे 
हो ....... सुटतील केंव्हा उखाणे 
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हि रे माझा मितवा
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे,
तू हि रे माझा मितवा.... तू हि रे माझा मितवा 

झुला भावनांचा उंच उंच न्यावा, स्वत:शी जपावा तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे, भिजल्यावरी प्यास का उरे मागे
फितूर मन बावरे, आतुर क्षण सावरे 
हो ..... स्वप्नाप्रमाणे पण खरे, 
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हि रे माझा मितवा
नात्याला काही नाव नसावे, तू हि रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे,
तू हि रे माझा मितवा ..... तू हि रे माझा मितवा

वेड पांघरावे न व्हावे शहाणे, ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हूर हूर वाढे गोड अंतरी ही, पास पास दोघात अंतर तरी ही
चुकून कळले जसे, कळून चुकले तसे,
हो ..... उन-सावलीचे खेळ हे 
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हि रे माझा मितवा

तू हि रे माझा मितवा ..... तू हि रे माझा मितवा

-----------------------------------------------------

Video :

#SwapnilJoshi #SonaleeKulkarni #Mitwa